नवी दिल्ली :
डिजिटल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस क्षेत्रातील कंपनी एक्सलरेटबीएस इंडिया यांचा आयपीओ 6 जुलै रोजी सबक्रीप्शनसाठी खुला होणार आहे. आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 11 जुलैपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे. या आयपीओकरिता 90 रुपये प्रति समभाग अशी किंमत अंतिम करण्यात आली आहे. एकंदर 6.32 लाख समभागांची विक्री केली जाणार आहे. या अंतर्गत 1.70 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग विक्रीकरता असून 3.99 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहेत.









