मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर
प्रतिनिधी / बेळगाव
वायव्य शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सोमवार दि. 13 रोजी मतदान होणार असून आता प्रचारासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांनीही यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाचे नेतेमंडळीही बेळगावात दाखल होऊन त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. भाजप, काँग्रेस, निजद या तिन्ही पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तसेच अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. शिक्षण संस्थांमध्ये जाऊन प्रचार केला जात आहे. याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन मतदारांवर आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे. वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी अनेक मतदान केंदे स्थापन केली आहेत. त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. मतपत्रिकेद्वारे ही निवडणूक होत असल्याने मतदान प्रक्रियेलादेखील विलंब होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. आता प्रचारासाठी दोनच दिवस शिल्लक असून सर्वचजण जोरदार प्रचार करण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.









