बेळगाव : जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. यामुळे देशातील शांतता बिघडविण्याचा हा एक प्रयत्न असून केंद्र सरकारने दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अभाविपने राणी चन्नम्मा चौकामध्ये दहशतवाद्यांचा निषेध केला. त्यानंतर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देशात दहशतवादाच्या माध्यमातून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा हल्ल्यांमधून देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असून केंद्र सरकारने याबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अभाविपचे शहर सचिव रोहित अलकुंटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleकल्लेहोळ येथील खडीमशीनमुळे पिकांचे नुकसान
Next Article काश्मीरमधील धर्मांध दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









