वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विद्यापीठ (डीयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यावर्षीच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत (डीयूएसयू निवडणूक 2025) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) उमेदवारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. एबीव्हीपीच्या आर्यन मान यांनी अध्यक्षपद जिंकले आहे. त्यांनी एनएसयूआयच्या उमेदवार जोसेलिन चौधरी यांचा पराभव केला आहे. बिहारची रहिवासी दीपिका झा हिची संयुक्त सचिव म्हणून निवड झाली आहे. यावेळी एबीव्हीपीच्या उमेदवारांनी चार मुख्य पदांपैकी तीन पदांवर विजय मिळवला. चार पदांसाठी 21 उमेदवार निवडणूक लढवत होते.









