पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद : जमावाने पेटविली शाळा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकावर पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न पाहण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली होती. हा प्रकार मुख्याध्यापकाला समजताच त्याने स्वत:च्या पातळीवर हा विषय दडपण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती करीमगंज पोलीस अधीक्षक पार्थ प्रतिम दास यांनी दिली आहे.
संतप्त कुटुंबीयांनी मुख्याध्यापकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो घटनास्थळावरून पळून गेला होता. यानंतर लोकांनी शाळेत तोडफोड करत ती पेटवून दिली आहे.
मुख्याध्यापक विद्यार्थिनीला अनेक दिवसांपासून पॉर्न दाखवत होता. घरी आल्यावर विद्यार्थिनीने याचा उल्लेख स्वत:च्या आईसमोर केला होता. तसेच मुख्याध्यापक विद्यार्थिनीशी गैरवर्तनही करत होता.









