ऑनलाईन टीम / पुणे :
आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेत केलं. आझमींच्या या वक्तव्यावरुन सभागृहात घमासान झालं. आमदारांनी आक्रमक होत वेलमध्ये येऊन आझमींविरोधात घोणाबाजी केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
सभागृहात लक्षवेधीचा मुद्दा मांडताना आझमी म्हणाले, एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर मुस्लिमांविरोधात देशात रोष तयार झाला. हिंदू समाजाचे मोर्चे निघू लागले. या मोर्चांमध्ये मुस्लिमांना एवढं अपमानित करण्यात आलं की मुस्लिमांपेक्षा देशदोही दुसरे कोणीच नाही.
आणखी एका घटनेत 29 मार्चला सायंकाळी 5 वाजता औरंगाबादमध्ये तीन लोक राममंदिराजवळ दुचाकीवरुन आले. त्यांनी ‘इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम् कहना होगा’ अशा घोषषा दिल्या. अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम् म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो. जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली.
#WATCH | Maharashtra Samajwadi Party MLA Abu Azmi says, "I respect 'Vande Mantram' but I can't read it because my religion says we can't bow down to anyone except 'Allah'. pic.twitter.com/uYJmkR7GWj
— ANI (@ANI) July 19, 2023
दरम्यान, आझमींच्या या वक्तव्यावरुन विधानसभेत आमदार आक्रमक झाले. आमदारांनी वेलमध्ये येऊन आझमींविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झाले. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर फडणवीस यांनी यावर उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगीत आहे. देशातील करोडो लोकांची वंदे मातरम्बाबत श्रद्धा आहे. असा कोणता धर्म सांगेल आपल्या आई समोर डोकं टेकवू नका. आझमी यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. चुकीचे अर्थ काढू नका. आपण संविधान मानतो म्हणून आपण या ठिकाणी येतो. या सभागृहातही आपण वंदे मातरम् आणि जन गण मनं म्हणतो. त्यामुळे मला वाटतं ही भावना योग्य नाही, बाकी आपले मुद्दे आपण इथे मांडा.