वृत्तसंस्था/ कन्नूर
2011 मध्ये झालेल्या सौम्या बलात्कार-हत्या प्रकरणातील गुन्हेगार गोविंदाचामी तुरुंगातून फरार झाला, गोविंदाचामी हा केरळच्या कन्नूर मध्यवर्ती तुरुंगात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता, परंतु शुक्रवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली आहे. तुरुंगातील उंच भिंतीवरून उडी घेत तो फरार झाला होता, परंतु केरळ पोलिसांनी त्याला केवळ 10 तासांमध्ये ताब्यात घेतले आहे. गोविंदाचामीने 2011 मध्ये सौम्यावर बलात्कार करत तिची हत्या केली होती.









