Abhijit Bichukale :अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेत कसबा पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणुक आयोगाला तसे पत्रही दिले आहे. याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना बिचुकले म्हणाले की, निवडणूक आयोगाचा खुपच ढसाळ कारभार आहे, म्हणून निवडणूक आयोगाला मी पत्र दिले आहे. संपूर्ण निवडणूक अशी पैसे वाटून जे कॅमेरॅत दोषी सापडत आहेत. तरी तुम्ही त्यावर कारवाई करणार नसाल तर ही निवडणूक प्रक्रिया ठप्प करा आणि नव्यानं निवडणूक घ्या, अस मी पत्रात म्हटलं आहे. असं जर तुम्ही लोकांना आमिषं देत असाल तर निवडणूक नियमांनुसार तो गुन्हा आहे, त्यामुळं त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये मी जरी मतदारांना कुठल्याही प्रकारचं आमिष देत असेल तर माझ्यावरही कारवाई करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








