रयत सेवा संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव ; दुष्काळ आणि महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. असे असताना आधारला-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे मोठा फटका बसत असून, तातडीने तो दंड रद्द करावा, या मागणीसाठी नेगील योगी रयत सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महागाईमुळे शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे. यातच आता विविध कारणांसाठी रक्कम आकारली जात आहे. त्या रकमेची तरतूद कशी करायचा, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. तेव्हा तातडीने ती रक्कम रद्द करावी. आता मुदतवाढ करून देण्यात आली आहे. मात्र मुदतवाढ करून दिली तरी हजार रुपये रक्कम द्यावीच लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तेव्हा तातडीने ती रक्कम रद्द करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. अप्पर जिल्हाधिकारी के. शांताला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील, वाय. एन. बुर्ली, यल्लाप्पा तळवार, अर्जुन पागद, फकिराप्पा देसाई, कल्लाप्पा रपाटी, गंगाण्णा शिंगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









