कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पक्षाचे नेते विविध तपास यंत्रणांच्या रडारवर असून काही जण तुरुंगातही पोहोचले आहेत. ईडीने आता तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांना कोळसा चोरी प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावला आहे. अभिषेक बॅनर्जी यांना शुक्रवारी सकाळी ईडीच्या कोलकाता येथील कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. याप्रकरणी ईडीने मार्च महिन्यात अभिषेक यांची चौकशी केली होती. तृणमूल काँग्रेस नेते विनय मिश्रा आणि अनूप मांझी या घोटाळय़ातील मुख्य आरोपी आहेत.









