वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2008 च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे नेमबाज अभिनव बिंद्राची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) मानसिक आरोग्यदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयओसीच्या मानसिक आरोग्य कार्यकारी गटामध्ये गेल्या काही कालावधीपासून अभिनव बिंद्रा हे एक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. नेमबाजी प्रकारामध्ये मानसिक स्थिरतता समतोल राखताना नेमबाजांना खूपच कठीण जाते. त्यामुळे त्यांना शारीरिक तंदुरुस्तीवर अधिक भर द्यावा लागतो. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी चांगल्या राखण्यासाठी आयओसीची मानसिक आरोग्य कार्यकारी संघटना कार्यरत आहे.









