आचरा प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या आचरा विभागीय संघटक प्रमुखपदी अभिजित सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते अभिजित सावंत यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, उद्योजक संतोष कोदे अभय भोसले, मनोज हडकर, सचिन हडकर. दादा साईल, मंदार लुडबे, चंदू गोलतकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, पंकज अचरेकर, बाबू कदम, उदय घाडी इतर मान्यवर उपस्थित होते









