वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील रेडवूड सिटीमध्ये सुरु असलेल्या सिलिकॉन व्हॅली खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू अभय सिंगने विजयी सलामी दिली. मात्र या स्पर्धेत भारताचे सेंथिलकुमार आणि रमित टंडन यांना हार पत्करावी लागली.
अभय सिंगने पहिल्या फेरीतील सामन्यात इजिप्तच्या करीम हमामीचा 12-10, 11-7, 13-11 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. 130,500 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत अभय सिंगचा दुसऱ्या फेरीतील सामना फ्रान्सच्या क्रोयूनशी होणार आहे. इजिप्तच्या करिम तुर्कीने सेंथिलकुमारचा 11-3, 11-5, 11-9 तर हंगेरीच्या बॅलेझेस फेरकेसने टंडनचा 10-12, 11-5, 11-5, 11-9, 11-8 असा पराभव केला.









