वृत्तसंस्था / दोहा
भारतीय स्क्वॅशशपटू अभय सिंगने रविवारी येथे झालेल्या 231,500 डॉलर्सच्या पीएसए प्लॅटिनम स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानावर असलेल्या करीम गवादला पराभवाचा धक्का दिला. पीएसए टूरवर भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू अभयने 41 मिनिटांत 11-6, 11-4, 1-11, 11-9 असा हा त्याचा टॉप पाचमधील खेळाडूवर मिळविलेला पहिला विजय आहे.
अभयची पुढील लढत इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या फारेस देसैकीशी होईल. भारताच्या 36 व्या स्थानावर रमित टंडनला पहिल्या फेरीत इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मुस्तफा असलकडून 4-11, 7-11, 4-11 अशी हार पत्करावी लागली.









