वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फिलाडेलफिया येथे सुरू असलेल्या 226,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्केमच्या पीएसए प्लॅटिनम स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या स्क्वॅशपटू अभय सिंगने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. 27 वर्षीय अभय सिंगने इजिप्तच्या मोहम्मद अलशेरबेनीचा 11-8, 4-11, 4-11, 11-6, 11-5 अशा गेम्समध्ये 62 मिनिटांत पराभव केला. आता अभय सिंगचा पुढील सामना वेल्सच्या तृतिय मानांकीत मेकीन बरोबर होईल. मात्र भारताच्या रमीत टंडनला न्यूझीलंडच्या पॉल कॉलने 11-5, 11-9, 11-7 असे पराभूत केले.









