वृत्तसंस्था / फिलाडेलफिया
226,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या पीएसए प्लॅटिनम अमेरिकन खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू अभय सिंगला वेल्सच्या मेकिनकडून पराभव पत्करावा लागला.
वेल्सच्या तृतिय मानांकीत जोयेल मेकिनने अभय सिंगचा 11-2, 11-5, 11-4 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या महिन्यात डोहा येथे झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत पाचव्या मानांकीत करिम गेवादने अभय सिंगचा पराभव केला होता.









