वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2026 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने अभय शर्माला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून निवड केली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अभय शर्मा याने यापूर्वी 19 वर्षाखालील भारताच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाताळली होती. अलिकडेच अभय शर्माने युगांडाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाबरोबर प्रमुख प्रशिक्षक या नात्याने करार केला आहे. 56 वर्षीय अभय शर्माने यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघालाही योग्य मार्गदर्शन केले आहे.









