वृत्तसंस्था / दोहा
सोमवारी येथे झालेल्या 231,500 अमेरिकन डॉलर्सच्या पीएसए प्लॅटिनम स्पर्धेत भारताचा अभय सिंग पाच गेम्स थरारक लढतीत इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या फारेस देसौकीविरुद्ध पराभूत झाला.
मागील फेरीत माजी विश्वविजेता आणि सध्याच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या इजिप्तच्या करीम गवादला पराभूत करणाऱ्या जागतिक क्रमावारीत 35 व्या स्थानावर असलेल्या अभयने देसौकीविरुद्ध दोनदा आघाडी घेतली होती. त्यानंतर देसौकीने 66 मिनिटांत 11-13, 11-5, 9-11, 11-3, 11-3 असा विजय मिळवला. आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक पदक विजेता 27 वर्षीय अभय पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या पीएसए कांस्य स्पर्धेत खेळणार आहे.









