Abdul Sattar On Guwahati Tour: कामाख्या देवीला जाण्यासाठी आजचाच दिवस आहे,असे नाही.नंतर कधी तरी जाईन.मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखेच आहे.मुख्यमंत्र्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की,ते दुसऱ्याला भविष्य विचारण्यासाठी हात दाखवणार नाहीत. नाशिक येथील कृषी प्रदर्शनाला येणे निश्चित होते. त्यामुळेच गुवाहाटीला जाऊ शकलो नाही. मी अजिबात नाराज नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आमचं सगळं चांगलं सुरू असल्याचा’ दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.शिंदे गटाचे आमदार शनिवारी कुटुंबासह गुवाहाटीमध्ये (Guwahati) कामाख्या मातेच्या (Kamakhya Mata Mandir) मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. मात्र याचवेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांसह (Abdul Sattar) काही आमदार मात्र या दौऱ्यापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यावरून सत्तार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर सत्तार यांनी उत्तर दिले.
कामाख्या देवीला रेड्यांचा बळी दिला जातो, आता कोणत्या रेड्याचा बळी दिला जाणार असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता. य़ाला उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले की,शेवटी रेड्याची बळी देणं धार्मिक भावना आहे. त्यासाठी अजित पवारांनी स्वतः जायला पाहिजे आणि सोबत एखादा बारामतीचा रेडा घेऊन जायला पाहिजे असा टोला सत्तार यांनी लगावला. अजित पवारांनी बळी द्यायला पाहिजे त्यात काय, चांगलंच आहे. ज्यांना-ज्यांना वाटत असेल की रेड्याचा बळी द्यावा त्यांनी आपल्याच गावचा रेडा घेऊन जायला पाहिजे असेही सत्तार म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








