ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर राज्यभरात एकाचे तीव्र पडसाद उमटताना दिस आहेत. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात राज्यभरात निदर्शन करण्यात येत आहेत. मुंबईत त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या बंगल्याचीही तोडफोड करण्यात आली. सत्तार यांच्या राजीनाम्याचीही मागणी होतं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यस्ती केली असून त्यांनी सत्तारांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यभरात सत्तारांविरोधात आंदोलन सुरू आहे. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येतेय. दरम्यान, या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती केली असून त्यांनी सत्तारांना फोन करून सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांचे कान टोचले असून दुसरीकडे शिंदेंनी गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. हे प्रकरण कसं शांत करायचं याबाबत या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
सत्तारांकडून फक्त दिलगिरी :
सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यात त्यांनी कुठेही सुप्रिया सुळेंचं नाव घेतलेलं नाही. जे आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललो. मी कोणत्याही महिलेबद्दल बोललो नाही. मी महिलांचा सन्मान करतो. पण कुठल्या महिलेचं मन दुखलं असेल तर मी खेद व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो. कुठल्या महिलेचं मन दुखलं असेल तर मी सॉरी बोलतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.