ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेत (shiv sena) सर्व काही अलबेल नाहीये. अजून पाच आमदार आणि तीन खासदार शिंदे गटात (shinde group) येणार आहेत. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केला आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना हा मोठा राजकीय दावा केला आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार) ते परभणीत होते. यावेळी त्यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता, सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचं निवेदनही स्वीकारलं.
हे ही वाचा : ‘पीएफआय’ वरून आशिष शेलार म्हणाले, आता कुठल्या बिळात बसला आहात?
सत्तार पुढे बोलताना म्हणाले, शिवसेनेला नुसतंच खिंडार पडणार नाही तर येत्या दहा वर्षात उद्धव ठाकरे यांची राज्यात सत्ताच येणार नाही. मी सांगतो ते लक्षात ठेवा, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आम्ही ४० आमदार प्लस १०, त्यात पाच आमदार आणखीन येणार आहेत. पहिले 10 खासदार होते नंतर 12 खासदार झाले. दोन-तीन आणखीन येणार आहे. तरी हे लोक म्हणतात हे असली, हे नकली. अरे ते येणारे का पागल आहेत का? आणि हे आले सती सावित्री, आता गल्ली बोळात फिरत आहेत. अरे पहिले असे फिरले असते तर ही वेळ आली नसती ना, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
याशिवाय “हे कशामुळे झालं, घरात बसल्यामुळे झालं. आज तुमची मैदानात उतरण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवण्याचे स्वप्न पाहत आहात, मग अडीच वर्षे काय केलं? मुख्यमंत्री हे छोट पद नाही, तो किती मोठी किती शक्तीशाली असतो याचा अंदाज मी लावू शकतो. ज्यावेळी होता त्यावेळी काही दिलं नाही, आता नाहीत तर काय देणार? तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही.” असंही सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता बोलून दाखवलं.