महिलांच मन दुखावलं असेल तर मी खेद व्यक्त करतो. कोणाचही मन दुखेल असे शब्द मी बोललो नाही. तरीही कुणाचे मन दुखले असेल तर मी माफी मागतो अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
यांनी माध्यमांना दिली. जे आम्हाला बदनाम करतात. जे आम्हाला खोके घेतले असं म्हणतात त्यांच्यासाठी हे उत्तर असल्याचे त्यांनी म्हटलयं.मी कोणत्य़ाही अल्टीमेटमला घाबरत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंचं नाव न घेता मी महिलांच मन दुखावलं असेल तर शब्द मागे घेतो असं म्हणत आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. सत्तारांच्या घराच्या काचा फोटल्या आहेत. तर सत्तारांचा राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादीच्या महिला प्रतिनिधींनी दिला. तीन मंत्र्यांचा राजीनामा द्या. गुलाबराव पाटील, रविद्र चव्हाण यांनीही अपशब्द वापरला आहे. यांच्यावरही कारवाई करा,जोपर्यंत सुप्रिया सुळेंची समोर येवून सत्तार माफी मागत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.गुलाबराव पाटील आणि आता अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले आहेत, आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यांच वादग्रस्त विधान
“इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
सत्तारांना २४ तासांचा अल्टिमेटम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना शब्द मागं घेण्यासाठी २४ तासांची मुदत दिली. येत्या २४ तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी,असं मिटकरी म्हणाले.तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळले जातील,असं म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








