दुसरी पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धा
बेळगाव : गोवावेस कॉर्पोरेशन जलतरण तलावात आबा हिंद स्पोर्ट्स व क्रीडा भारती यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा क्लबच्या जलतरणपटुंनी उत्कृष्ट कामगिरी करून 929 गुण वसूल करीत जनरल चॅम्पियनशिप मिळविली. तर स्वीमर्स क्लबने 612 गुण घेऊन द्वितीय स्थान मिळविले. दुसऱ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या जलतरण स्पर्धेत 15 नवीन स्पर्धाविक्रमांची नोंद झाली. ग्रुप एकमध्ये स्वरूप धनुचेने 50 मी. फ्रीस्टाइलमध्ये 24.88 सेकंदाचा विक्रम केला तर तनुज सिंगने 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये 1 मिनिट 06.84 सेकंदाचा विक्रम केला. या स्पर्धेतील वैयक्तिक विजेते पुऊष गट- स्मरण मंगळूरकर, स्वरूप धनुचे, सार्थक श्रेयकर, मोहित काकतकर, भगतसिंग गावडे, हर्षवर्धन कर्लेकर, महिला गट- सुनिधी हालकारे, वेदा खानोलकर, निधी कुलकर्णी, आरोही चित्रगार, स्वरा कलखामकर, पाकी हलगेकर, दर्शिका निट्टूरकर यांनी आपापल्या गटात वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र मुंदडा, अनंत जांगळे, लक्ष्मणराव पवार, ए. बी. शिंत्रे, शितल हुलबत्ते, उपाध्यक्ष राजू गडकरी व स्पर्धा संयोजक विश्वास पवार यांच्या हस्ते जलतरणपटूंना चषक, प्रशस्तीपत्र, पदके देऊन गौरविण्यात आले. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील हनमन्नावर, विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, माऊती घाडी, सुधीर धामणकर, वैभव खानोलकर, सुनील जाधव, हरीश मुचंडी, सतीश धनुचे, अभिषेक केस्तिकर, राहुल काकतकर, रामकृष्ण, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, शितल जाधव, स्नेहल धामणकर, गौरी जुवळी, एकता सिंग, हर्षाली पाटील, गौरी बेळगोजी, कलाप्पा पाटील, विशाल वेसणे, चंद्रकांत बिळगोजी, भरत पाटील, विजय नाईक, विजय भोगन, किशोर पाटील, निखिल भेकणे, प्रांजल सुलधाळ, ओम घाडी, ओंकार लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.









