वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील स्पोकेनी येथे नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कनिष्ठांच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीने कास्यपदक मिळवले.
मुलांच्या एकेरीतील झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या फर्रानने भारताच्या आयुष शेट्टीचा 21-18, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. या स्पर्धेत चौथ्या मानांकित आयुष शेट्टीला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कनिष्ठांच्या या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या 10 बॅडमिंटनपटूंनी पदके मिळवली आहेत. 2006 आणि 2008 साली या स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालने अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदक मिळवले होते. तसेच 2022 साली स्पेनमध्ये झालेल्या विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या एस एस शंकर मुथ्थुसॅमीने पुरुष एकेरीचे रौप्यपदक पटकावले होते.









