वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्सच्या शाळेची विद्यार्थिनी आराध्या पाटील हिची सार्वजनिक शिक्षण विभाग आयोजित एसजीएफआय राज्यस्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल संघात निवड झाली असून, म्हैसूर येथील कुर्ग येथे होणाऱ्या फुटबॉल सामन्यासाठी शाळेचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विद्यार्थिनीला फादर अँड्र्यू फिलिप तसेच शाळेचे प्राचार्य, व्यवस्थापन, शिक्षक यांचे मार्गदर्शन तर वडील संतोष पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









