Aaradhya Bachchan: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या प्रकृतीविषयी काही युट्युब चॅनल्सनी अफवा पसरवल्या होत्या.या संदर्भात बच्चन कुटुंबीयांनी दिल्ली हाय कोर्टात चॅनल्स विरोधात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये चॅनल्सना समन्स बजावला आहे.
दिल्ली हाय कोर्टानं युट्युबला आक्षेपार्ह माहिती काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर कोर्टानं युट्युब वरील अनेक चॅनल्सना समन्स देखील बजावल आहे. आराध्यानं तिचे वडील अभिषेक बच्चन यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती. आराध्याचं म्हणणं होतं की या वादग्रस्त व्हिडीओच्या माध्यमातून ती गंभीररित्या आजारी असल्याचं दाखवलं गेलं होतं.
नेमक काय घडलय
काही युट्युब चॅनल्सनी आराध्या आजारी असल्याची माहिती पसरवली होती. याचा नाहक त्रास बच्चन कुटुंबाला झाला. यावरून अनेकदा आराध्या बच्चनला ट्रोल केलं गेलं. यावरून अभिषेक बच्चन रिअॅक्ट झाला होता. मुलीच्या विरोधात काहीही चुकीचं बोललं गेलं तर तो सहन करणार नाही असंही तो म्हणाला.दरम्यान,दिल्ली हाय कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









