Gujrat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीचा धुरळा शिगेला पोहोचला आहे. भाजप, (BJP) कॉंगेस (Congress) आणि त्यातच आता आम आदमी पक्षाच्या ( AAP ) आगमनामुळे ही लढत रंगतदार बनली आहे. ‘आप’च्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी जुनी पेन्शन योजना ३१ जानेवारीपर्यंत लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. ते सुरत येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आपल्या मतदारांना आकर्षित करताना ते म्हणाले, “आम आदमी पक्ष गुजरातमध्ये पुढील सरकार स्थापन करेल.” सरकार स्थापनेनंतर पुढील वर्षी २०२३ च्या जानेवारी अखेरीस जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विविध योजनांची माहिती देत माध्यमांशी संवाद साधला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









