ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गुजरातमध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वीच ‘आप’च्या नवनियुक्त आमदाराने भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भूपतभाई भयाणी (Bhupatbhai Bhayani) असे या आमदाराचे नाव आहे. भयानी जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते या निवडणुकीच्या काही दिवस आधीच भाजप सोडून आपमध्ये सामील झाले होते. भाजपने या जागेवर हर्षद रिबाडिया यांना तिकीट दिले होते.
या निवडणुकीत भयानी यांना 65675 तर हर्षद यांना 58771 मते मिळाली होती. भयानी यांनी 6904 मतांनी ही निवडणूक जिंकली होती. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ते तब्बल दोन महिने गुजरातमध्ये तळ ठोकून होते. गुजरातमध्ये ‘आप’ला एकूण 5 जागा मिळाल्या आहेत. मात्र, आता एका आमदाराने केजरीवालांची साथ सोडल्यानंतर आपकडे चारच आमदार उरतील.









