लाचखोर प्रकरणात मंत्र्यावर कारवाई
प्रतिनिधी /पणजी
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लाचखोरीच्या प्रकरणात आपल्याच मंत्र्याविरुद्ध केलेल्या कारवाईचे गोव्यातील आप नेत्यांनी स्वागत केले. गोव्यातील आप नेत्यांनी सांगितले की, लाच घेताना राज्य सरकारने आपल्याच मंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणे ही ऐतिहासिक घटना आहे.
वाल्मिकी नाईक म्हणाले की, पक्षाची स्थापना भ्रष्टाचारविरोधी तत्त्वावर झाल्याने, अशी कारवाई करणे हे केवळ ‘आप’ लाच शक्मय आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये असे झाले असते तर भ्रष्टाचाराचे पैसे वाटून घेण्यावर चर्चा झाली असती आणि त्यात सहभागी असलेल्या मंत्र्याला शिक्षा देखील झाली नसती.
नाईक म्हणाले की, ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 2015 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर लाच मागणाऱया स्वतःच्या मंत्र्यावर कारवाई केली होती. जनतेला दिलेली आश्वासने आणि दिलेला वचन पाळणारा एकमेव पक्ष आहे.
असे आपचे मुख्य प्रवक्ते राजदीप नाईक म्हणाले.
गोव्यात भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. दक्षता विभागात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. विरोधी पक्ष जेव्हा भ्रष्टाचार उघड करतात तेव्हाच संबंधित अधिकारी प्रक्रिया सुरू करतात. मात्र, ‘आप’ने स्वतःच्याच मंत्र्याविरोधात कारवाई करून जगासमोर मोठे उदाहरण प्रस्थापित केले आहे, असे उपाध्यक्ष संदेश तेलेकर म्हणाले.









