नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्या याचिकेवर उत्तरप्रदेश सरकारला नवा नोटीस जारी केली आहे. राज्यात रुग्णालये आणि शाळांच्या स्थितीवर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी सोमनाथ भारती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे प्रकरण दिल्लीतील राउज अॅव्हेन्यू न्यायालयात वर्ग करण्याची विनंती सोमनाथ भारती यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. याप्रकरणी आता तीन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.









