आणखी एका नेत्याने पत्करला मार्ग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत आम आदमी पक्षाला सत्ता गमवावी लागल्यावर याचे नेते आता युट्यूबवर स्वत:साठी शक्यता शोधू लागले आहेत. सौरभ भारद्वाज यांच्यानंतर पक्षाच्या आणखी एका नेत्याने युट्यूब चॅनेल सुरू करत ह्यूज कमाविण्याचा प्रयतन सुरू केला आहे. किराडीचे माजी आमदार ऋतुराज झा यांनी स्वत:च्या नावाने युट्यूब चॅनेल सुरू क रून यावर ते राजकारणासोबत लाइफस्टाइल, ट्रॅव्हल समवेत सर्व विषयांवर व्हिडिओ अपलोड करणार आहेत.
एका दशकापेक्षा अधिक काळापर्यंत सत्तेवर राहिल्यावर आप पहिल्यांदाच दिल्लीत विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. एकीकडे पक्षचे नेते वीज, शिक्षण, रुग्णालय, मोफत बस प्रवास यासारख्या अनेक मुद्द्यांवर भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काही नेते आता युट्युबवर स्वत:ची उपस्थिती मजबूत करू पाहत आहेत.
दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज हे यावेळी ग्रेटर कैलास मतदारसंघात पराभूत झाले ओहत. अशास्थितीत त्यांनी स्वत:ला बेरोजगार संबोधित ‘बेरोजगार नेताजी’ नावाने युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. घर चालविण्यासाठी मला नव्या कामाचा शोध होता असे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी भारद्वाज यांना दिल्लीत पक्षाची धुरा सोपविली आहे. दिल्लीचे पक्ष संयोजक झाल्यावरही भारद्वाज हे पार्ट टाइम युट्यूबर म्हणून काम करत आहेत.









