Manish Sisodia Arrest : कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना हाय कोर्टा त हजर करण्यात आलं. सीबीआयने आठ तास चौकशी केल्यानंतर मनीष सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक केली. त्यानंतर सीबीआयने सिसोदियांच्या कोठडीची मागणी कोर्टाकडे केली आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या आटकेच्या निषेधार्थ देशभरात आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.आपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध केला आहे.
दरम्यान, मनीष सिसोदियांच्या अटकेवरून केंद्रातील भाजप सरकारवर ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. तुमच्या पक्षात सगळे संत आणि महात्मे आहेत का? असा सवाल त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारला केला आहे.जर महाराष्ट्रातील झाड हलवल तर 100 भ्रष्टाचार बाहेर येतील असेही ते म्हणाले
याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, स्वायत्त संस्थानंवर अशा पध्दतीचे आक्षेप घेणं हे अतिशय चुकीचं आहे.जिथे कारवाई होते तिथे शासकीय संस्थावर आरोप केले जातात अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुक आयोगाने तोच निर्णय जर तुमच्या बाजूने दिला असता तर आयोग चांगला आहे अशी प्रतिक्रिया तुम्ही दिली असती. आपल्या देशात लोकशाही आहे. जो निर्णय झालाय तो स्विकारला पाहिजे असे मला वाटतय असेही ते म्हणाले.
Previous Articleमहामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Next Article कार्ला देवस्थान ट्रस्ट निवडणुकीचा निकाल जाहीर









