प्रतिनिधी,कोल्हापूर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करण्यासाठी येथील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुक आंदोलन केले. पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यासमारे दिवसभर हे आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला.
आम आदमी पक्षाच्या निवेदनात केंद्र सरकार ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या आरोपात अडकवत आहे. आम आदमी पक्षाचे दिल्लीतील शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना ईडीने यापुर्वी अटक केली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. केंद्राच्या या दडपशाहीला विरोध करण्यासाठी आम आदमी पक्षाने रविवारी देशव्यापी मुक आंदोलन केले.
हवाला कायद्याचा गैरवापर करून ‘आप’च्या मंत्र्यांना अटक करण्यात येत आहे. आप पक्षाची केंद्र सरकारने धास्ती घेतली आहे. लोकसभा निवडणुका समोर ठेवूनच केंद्राकडून दडपशाहीचा हा प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केला. मुक आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दृष्यंत माने, विजय हेगडे, प्रथमेश सुर्यवंशी, अमरसिंह दळवी, समीर लतीफ, आदम शेख, सुरज सुर्वे, उमेश वडर, पुजा आडदांडे, उषा वडर, डॉ. कुमाजी पाटील, किशोर खाडे, डॉ. उषा पाटील, शशांक लोखंडे, मयुर भोसले, राज कोरगावकर, राकेश गायकवाड, मंगेश मोहिते, लाला बिरांजे, संजय नलवडे आदी सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









