रत्नागिरी :
जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश प्रताप साळवी यांनी मंत्री उदयसामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. परेश साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची ताकत वाढली आहे. शिवसेनेच्या जनसेवेच्या कार्यामुळे आणि पक्षाच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी परेश साळवी यांचे स्वागत केले.








