वृत्तसंस्था / जयपूर
आम आदमी पक्षाने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची सूची प्रसिद्ध केली आहे. ही या पक्षाची राज्यातील दुसरी सूची आहे. दुसऱ्या सूचीत बिकानेर पश्चिम साठी मनीष शर्मा, सिकारसाठी झबर सिंग, सवाई माधोपूर साठी मुकेश भूप्रेमी आदींना उमेदवारी दिली आहे. तर जोधपूर येथून रोहित जोशी तर रामगढ येथून विश्वेंदर सिंग यांना तिकिट देण्यात आले आहे. आम आदमी पक्ष राजस्थानातील जवळपास सर्व विधानसभा जागा लढविणार आहे. तसेच पक्षाने मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथेही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.









