कुजिरा येथील हेडगेवार हायस्कूल प्रथम : तिसवाडीतील नऊ हायस्कूल्सचा सहभाग
प्रतिनिधी /तिसवाडी
नेवरा येथील आजमाने हायस्कूलने तिसवाडी तालुका मर्यादित आयोजित केलेल्या देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धेत बांबोळी कुजिरा येथील डॉ. के. ब. हेडगेवार हायसकूलने प्रथम क्रमांक पटकावला. तालुक्यातील 9 हायस्कूलनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेतील दुसरे बक्षीस नेवरा येथील दयानंद आर्या हायस्कूलला मिळाले. तिसरे बक्षीस रायबंदरच्या बालभारती विद्यामंदिर हायस्कूलने मिळविले. उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस चिंबलचे युनियन हायस्कूल, द्वितीय कुजिरा मुष्टीफ्ंढड हायस्कूल यांने पटकावले.
देशभक्ती समूहगीत गायन सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून अश स्पर्धातून त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्या बद्दल हायस्कूलचे अभिनंदन करतो, असे प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट सुनील सरदेसाई यांनी सांगितले.
आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत यापुढे देशभक्ती गीत गायन, फ्gढगडी व इतर स्पर्धा आयोजित केल्या जातील, असे शाळेचे अध्यक्ष रामराव वाघ यांनी सांगितले.
बालभवन केंदाचे शिक्षक देविदास गावस व वंदिता नाईक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. मुख्याध्यापक दिनेश सांतईनेजकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुविधा अवखळे यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा नाईक हिने आभार मानले.









