मुंबई
मराठी सिनेसृष्टीमध्ये एका मागोमाग एक लग्न होत आहेत. आत्ताच अभिनेत्री रेश्मा शिंदेचे लग्न झाल. तोवर अभिजीत गावकर यांच लग्न झालं. तोवर आता आई कुठ काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वालोकर हीने आपल्या लग्नाच्या केळवणाचा फोटो शेअर केला.
आई कुठे काय करते मालिकेतील आरोही म्हणजेच कौमुदी वालोकर हीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच तिने केळवणाचा फोटो, जेवणाच्या मेनुचा फोटो शेअर केला. त्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कौमुदीचा होणारा नवरा आकाश चौकसे हा UC Berkeley/e येथे संशोधक म्हणून आहे. त्याने पी एच डी सुद्धा केलेली आहे. त्याची स्वतःची वेबसाईट आहे. तर तो ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणूनही काम करतो. तर कौमुदीने क्लिनिकल सॉयकॉलॉजी केले आहे.









