Ambadas Danve On Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री हल्ला झाला . वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे सभेत दगडफेक करण्यात आली .आदित्य ठाकरेंच्या सभेतील पोलीस बंदोबस्तात कुचराई होती. आदित्य ठाकरेंच्या सभेची सूचना महाराष्ट्र प्रशासना देण्यात आली होती.मात्र पोलीसांनी कुचराई केली. याचा निषेध आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाजात वाद निर्माण करण्य़ाचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत पोलीस महानिरीक्षकांनी पत्रव्यवहार केला आहे. या पत्रात मी भूमिका मांडली आहे. तसेच निषेध व्यक्त केला आहे. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. सरकार जर अस करत असेल तर शिवसेनेला आपल्या नेत्याची सुरक्षा कशी करावी हे समजत असेही ते म्हणाले. तसेच सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली. तसेच हा सर्व प्रकार शिंदे गटात प्रवेश केलेले स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या इशाऱ्यावर करण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
यावर औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी आदित्य ठाकरे, अंबादास दानवेंच्या गाडीवर दगडफेक झाली नसल्याचे सांगितले आहे. गोंधळ झाला मात्र दगडफेक झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








