कोल्हापूर: शिवसंवाद यात्रेदरम्यान कोल्हापुरातील जेष्ठ नागरीक, तरुण, महिलांनी भरभरून प्रेम दिलं आहे. या संवादा दरम्यान मला खूप प्रम मिळालं आहे. लोकांचा सेनेवर खूप विश्वास आहे. प्रत्येकजण मला सांगतोय आम्ही उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहोत. कोणालाही गद्दारी आवडली नाही. हा दौरा राजकीय नाही. तानाजी सांवंत यांनी कोण आहेत आदित्य ठाकरें? असा सवाल केला आहे. त्यांना असाच विचार करू द्या. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ठाकरे कुटुंबाला, शिवसेनेला एकटे पाडण्याचा कट हे ४० गद्दार करत होते. मात्र जनता आमच्या सोबत राहणार, आम्हाला एकटे पडू देणार नाही याची आम्हाला खात्री आहे. ज्यांनी बंडखोरी केली त्या ४० आमदार आणि १२ खासदारांना जनताचं उत्तर देईल असा दावा त्यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांनी कार्यालयातून उध्दव ठाकरे यांचा फोटो काढायला सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, गद्दारांच खर रूप आता बाहेर यायला लागले आहे. कारवाई टाळण्यासाठी ते आतापर्यंत शिवसैनिक म्हणवून घेत होते. मात्र आता खरे चेहरे बाहेर आले. गद्दार हा गद्दारचं असतो. हे सरकार कोसळणारचं. कोणताचं राजकीय पक्ष खूश नाही. गद्दारीचा पॅटर्न जर इतर राज्य़ात गेला तर देशात असंतोषाचे वातावरण तयार होईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा- शिंदे गटातील आमदार गद्दारांची कीड,तानाजी सावंतांची लायकी काय?-विनायक राऊत
युती सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, ३३ दिवस उलटले तरी या बेकायदेशीर सरकारला अजून तिसरा माणूस सापडला नाही. हे दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. यात खरा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकांच्या हितासाठी, पर्यटनासाठी जिथे-जिथे फंड दिला त्याला स्थगिती दिली गेलीयं. यातुन महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. तुम्ही रिव्ह्यू काढा. तुम्हाला जे चांगले निर्णय वाटतात ते जनतेसमोर आणा. हे सरकार घटनाबाह्य,बेकायदेशीर आहे. दोन लोकांच मंत्रीमंडळ होऊच शकत नाही. मुळात त्यांची शपथविधीचं बेकायदेशीर आहे. आम्ही जास्त विश्वास ठेवला आणि जादा दिलं म्हणून याचा एवढा राग कसा काय हे मला अजूनही कळत नाहियं असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








