जयसिंगपूर: या सरकारला महाराष्ट्राला पुढे येऊ द्यायचे नाही. ही गद्दारी जनतेला मान्य नाही. ही गद्दारी मातोश्रीशी नाही, शिवसैनिकांशी नाही, उद्धव ठाकरे यांच्याशी नाही. ही गद्दारी माणुसकीशी आहे. आता या गद्दारांना माफी नाही अशा शब्दात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. आज त्यांची सभा जयसिंगपूर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ज्यांना यायचे आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. राज्यात फक्त दोन लोकांचे जम्बो सरकार आहे. हे सरकार गद्दारचे सरकार आहे. बेकायदेशीर आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणार, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे .त्यांच्या शिवसंवाद यात्रेला बंडखोरांना धडकी भरावी, असा प्रतिसाद लाभत आहे.आज त्यांची बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात सभा झाली. कोल्हापूर ते सभेचे ठिकाण असलेल्या जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी अवघ्या पाऊण तासाची वाट आहे. मात्र, ठिकठिकाणी नागरिकांकडून उस्फूर्तपणे झालेल्या स्वागताने त्यांना जयसिंगपूरमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल दीड तासांचा अवधी लागला. यावरून त्यांना मिळालेल्या प्रतिसादाची कल्पना येते.
हेही वाचा- दोन मंत्र्यांचं जम्बो सरकार,येत्या काही दिवसात कोसळणारचं-आदित्य ठाकरे
अनेक पक्षात पक्षांतर झाले आहे. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गलिच्छ राजकारण झालं नाही. गद्दारांनी साधले आहे. त्यांना जनतेने जागा दाखवावी असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








