राज्यात आज एकनाथ शिंदे व भाजप युतीचं सरकार प्रस्थापित झालं. आज एकनाथ शिंदे यांच्या गटात सेनेचे आमदार संतोष बांगर एका रात्रीत सामील झाले. विधानभवनात शिंदे गटाचे आमदार विजयाची खून दाखवतचं दाखल झाले. विधानभवनातील टीका-टिप्पणीचे अनेक व्हिडिओ आज व्हायरलं झाले. याचबरोबर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. तो व्हिडिओ म्हणजे विधानभवनाच्या आवारात बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे समोरासमोर आले. ज्यात आदित्य ठाकरे यांनी प्रकाश सुर्वे यांच्याशी साधलेला संवाद आहे. नेमके काय म्हणाले ठाकरे जाणून घेऊया.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे समोर दिसताच प्रकाश सुर्वे यांनी स्मित करत हस्तांदोलन केलं. त्यानंतर आदित्य हे सुर्वे यांना म्हणाले, एवढे जवळचे असूनही का असा निर्णय बदललात? त्या दिवशी जेवण तयार ठेवलं होतं तुम्ही. मी येणार होतो. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम आहे हे तुम्हालाही माहीत आहे. मला स्वत:ला दु:ख झालंय. ठीक आहे. बघा आता विचार करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








