आधारकार्ड जोडणीसाठी मतदारांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
मतदानकार्डाला आधार जोडणी मोहीम आजपासून जिल्हय़ामध्ये राबविण्यात येणार आहे. तरी मतदारांनी आधार जोडणी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.
दि. 4 सप्टेंबरपासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदानकार्ड काढताना बँक पासबुक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, पेन्शनचा दाखला किंवा इतर छायाचित्र असलेले कोणतेही ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर मतदानकार्ड आधारकार्डशी लिंक केले जाणार आहे. या अभियानाचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बोगस मतदान टाळण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने आधार जोडणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मतदारयाद्यांमधील नावाची दुरुस्ती करण्यासाठीही अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यासाठी रितसर अर्ज भरावेत, असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.









