बेळगाव वनमध्ये काम ठप्प, लाभार्थ्यांची धडपड
बेळगाव : शहरातील पोस्ट कार्यालयात नवीन आधारकार्डची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता पोस्ट कार्यालयात जावे लागत आहे. बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वन आणि सीएससी सेंटरवर आधारकार्डची प्रक्रिया सुरु होती. मात्र आता ती ठप्प झाली आहे. आता फक्त पोस्ट कार्यालयात नवीन आधारकार्डचे काम सुरु आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालयात लाभार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. आधारकार्ड सर्वत्र अनिर्वाय करण्यात आले आहे. शासकीय कामाबरोबर इतर ठिकाणीही आधारकार्ड गरजेचे बनले आहे. मात्र याच आधारकार्डचे काम कर्नाटक वन, बेळगाव वन आणि ग्राम वनमध्ये स्थगित झाले आहे.
केवळ आता पोस्ट कार्यालयात आधारकार्डची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनाही हेलपाटे मारावे लागत आहेत. कर्नाटक वन, बेळगाव वनमध्ये चालणारी आधारकार्डची कामे ठप्प झाली असून त्याऐवजी शहरातील पोस्ट कार्यालयात आधारकार्डची कामे केली जात आहेत. त्यामुळे आधारकार्डसाठी नागरिकांना आता पोस्ट कार्यालयामध्ये धाव घ्यावी लागत आहे. विशेषत: लहान बालकांचे नवीन आधारकार्ड काढण्यासाठी पोस्ट कार्यालय गाठावे लागत आहे.
आधार अपडेट बेळगाव वनमध्ये
बेळगाव वन आणि कर्नाटक वन कार्यालयात नवीन आधारकार्डचे काम ठप्प असले तरी या ठिकाणी आधारकार्ड अपडेट केले जात आहे. त्यामुळे आधारकार्ड अपडेटसाठी नागरिकांना बेळगाव वन कार्यालयात जावे लागत आहे.









