Ichalkaranji News : इचलकरंजी पंचगंगा नदीपात्र परिसरात राष्ट्रीय सेवा दलाला आधारकार्डाने आणि सरकारी कागदपत्रांनी भरलेल एक पोत सापडलं. मोठ्या प्रमाणात आधारकार्ड सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बोगस आधारकार्ड बनवून वापर केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
इचलकरंजीत पंचगंगा नदीपात्राचा परिसर राष्ट्रीय सेवा दलाकडून स्वच्छ करत असताना नदी काठाला एका पोते सापडले. ज्यामध्ये
आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड व काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे अज्ञाताने नदीत टाकली असावी. नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने ते पोते काटावर तसेच होते, असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पोत्यात डायरी, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सापडले आहे.
तर काही कागदपत्रे ओरिजनल असल्याचेही निष्पन्न झाले आहे. आधार कार्ड शहरातील जवाहर नगर, कबनूर या परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. या आधार कार्ड मध्ये छेडछाड करून निराधार लोकांना आधारकार्डमध्ये वयोमर्यादा वाढवून देऊन हे बोगस आधार कार्ड काढण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









