बेळगाव : देवगड विजयदुर्ग खाडी येथे आयोजित 8 व्या खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळविली. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांनी आयोजित केल्या होत्या. 17 वर्षावरील मुलांच्या गटांमध्ये 5 किलो मीटर स्पर्धेत स्मरण मंगळूरकरने सुवर्ण पदक पटकाविले. 17 वर्षाखालील मुले 3 कि.मी. स्पर्धेत प्रसाद सायनेकरने सुवर्णपदक तसेच मयुरेश जाधवने रौप्य पदक पटकाविले. नऊ वर्षाखालील मुले हर्षवर्धन कर्लेकाने एक कि.मी. पल्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.
51 वर्षावरील पुरुष गटांमध्ये दोन किलोमीटर स्पर्धेत अरुण जाधव ने सुवर्ण, मुकेश शिंदेने रौप्य पदक पटकाविले. 17 वर्षा खालील मुली श्रेष्ठा रोटीने 3 किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. 15 वर्षाखालील मुली प्राजक्ता प्रभूने 3 किलोमीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. 13 वर्षाखालील मुली अनीका बर्डेने 2 किलोमीटर स्पर्धेत कांस्य, 11 वर्षाखालील मुली निधी मुचंडीने एक किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. प्रजीत मयेकरने 3 किलोमीटर व प्रनम्या प्रभूने एक किलो मीटर स्पर्धेत आपल्या गटामध्ये सातवा क्रमांक पटकाविला. वरील यशस्वी जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, किशोर पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी व सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते.









