रायगड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला महाड मधील नवे नगर वसाहती मधून अटक करण्यात आली. ही कारवाई रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आली.
छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत पाटील (रा कोल्हापूर) याने सोमवारी सायंकाळी धमकीचा फोन केला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता ज्या फोनवरून धमकीचा फोन करण्यात आला होता त्या फोनचे लोकेशन महाडमध्ये असल्याचे आढळून आले. पुणे पोलिसांनी रायगड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी पहाटे महाड शहरातील नवे नगर भागात असलेल्या एका लॉजमधून पाटील याला ताब्यात घेतले. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दारूच्या नशेत त्याने हा धमकीचा फोन केल्याचे प्रार्थमिक तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार कराडे, पोलीस शिपाई ओंबले, पिंगळे तांदळे यांच्या पथकाने वरील कारवाई केली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








