इचलकरंजी हातकणंगले रस्त्या नजीक एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. भारत पांडुरंग यशाळ असे हत्त्या झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाची माहिती मिळताच हातकणंगले व शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत भारत यशाळ हा रेणूका झोपडपट्टी येथे रहातो, मॅकेनिक असलेने रात्री 12 च्या सुमारास ट्रक बंद पडला आहे असा फोन आल्याने तो घरातून बाहेर गेला, याचवेळी रघु जानकी हॉलच्या मागे भरत यशाळ युवकाची हत्या करण्यात आली अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. अद्याप या खुनामागचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत









