चार दिवसांपूर्वीच परतला होता परदेशातून
काणकोण : भगतवाडा, काणकोण येथील राष्ट्रीय महामार्गानजीक एका मालवाहू वाहनाने ठोकरल्यामुळे जांभळीमळ येथील जॉन फर्नांडिस (37 वर्षे) हा युवक जागीच ठार झाला. सदर अपघात बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघातात बळी पडलेला युवक चार दिवसांपूर्वी परदेशातून आला होता. सदर युवकाचा मृतदेह काणकोणच्या पोलिसांनी पंचनाम्यानंतर ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठविला असून या अपघाताला कारणीभूत झालेले वाहन ताब्यात घेतले आहे. एवढ्या मध्यरात्री हा युवक त्या ठिकाणी का गेला होता आणि अपघात कसा घडला हे प्रश्न सुटलेले नसून काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिश रा. देसाई पुढील तपास करत आहेत.









