संभाजीनगर, गणेशपूर येथे बांधकामावर घडली दुर्घटना
बेळगाव : तिसऱ्या मजल्यावर वाळूची पोती ओढत असताना तोल जाऊन पडल्याने आंबेवाडीच्या गवंडी कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. संभाजीनगर, गणेशपूर येथे ही घटना घडली असून पंकज सतीश पाटील (वय 32, रा. नवी गल्ली, आंबेवाडी) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. पंकज हा गवंडी काम करत होता. तो नेहमीप्रमाणे संभाजीनगर, गणेशपूर येथे कामासाठी गेला होता. तिसऱ्या मजल्यावर वाळू चढवत असताना तोल जावून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पंकज याच्या पश्चात भाऊ आहे.









