सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील बामणाईदेवी वाडी एका डोंगरावर राहणाऱ्या धनगर समाजाच्या वरक कुटुंबातील नाऊ वरक याने एमफील पीएचडी गोवा युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केली आहे. त्याची ही संघर्ष कथा नक्कीच आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे . असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी स्पष्ट केले. वरक हे धनगर समाजातील,चार शेळ्या आणि कच्च बांधकाम असलेले घर, आर्थिक अडचणी पाचवीला पुजलेल्या… अशी अत्यंत बिकट परिस्थिती,,.
अशा अत्यंत कठिण परिस्थितीत बालपण आणि शालेय शिक्षण झालेल्या नाऊ वरक या युवकाने शैक्षणिक क्षेत्रात आता मोठीच झेप घेतलेली आहे.









